
कणकवली : कणकवली तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी शरद कर्ले यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
अशासकीय सदस्यपदी गौतम खुडकर, सुजाता हळदिवे, विजय भोगटे, विजय कतरूड, भगवान दळवी, दीपक दळवी, विलास गावकर, गुरुनाथ वर्देकर, गजानन शिंदे यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार या समितीवर अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी, कणकवली न.पं.च्या मुख्याधिकारी यांची शासकीय प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.











