
सावर्डे : सह्याद्रि शिक्षण संस्था , सावर्डे यांचे मार्फत ता. १० ते १२ जानेवारी रोजी संस्था अंतर्गत सर्व व्यावसायिक महाविद्यालयांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये विविध खेळप्रकारांचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांमध्ये शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयाने तब्बल सोळा बक्षिसे संपादन करत दैदीप्यमान यश संपादन केले. कॅरम क्रीडा प्रकारामध्ये कृषि महाविद्यालयाच्या मुलींनी विजेतेपद पटकावले.बुद्धिबळ क्रीडा प्रकारामध्ये उद्यानविद्या महाविद्यालयामधील मुलींनी उपविजेतेपद , तर कृषि महाविद्यालयाच्या मुलांनी विजेतेपद पटकावले.
बॅटमिंटन क्रीडा प्रकारात कृषि महाविद्यालयच्या मुलींनी उपविजेतेपद मिळवले. तर बॅटमिंटन मध्ये कृषी महाविद्यालय मुलांनी विजेतेपद पटकावले व कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मुुले उपविजेते ठरले. व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मुलींनी विजेतेपद मिळवले व कृषि महाविद्यालय, मुली उपविजेते ठरले व कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, मुले उपविजेते ठरले. रस्सीखेच क्रीडा प्रकारात उद्यानविद्या महाविद्यालय मुले विजेते ठरले व कृषि महाविद्यालय, मुले उपविजेते ठरले. 4 ×100 मीटर रिले स्पर्धेमध्ये कृषि महाविद्यालय, मुली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात कृषि महाविद्यालय मुली यांनी प्रथम तर मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावला .गोळाफेक स्पर्धेत कृषि महाविद्यालयातील मुलींनी द्वितीय व जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, मुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रिडा निर्देशक सुहास आडनाईक, प्रा. पी.बी.पाटील, प्रा.सुशांत कदम,प्रा.संग्राम ढेरे, प्रा. प्रतिक कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.