'शंभो जय जय श्री रवळनाथ' गाण्याचे राजे खेमसावंतांनी केलं कौतुक !

कलाकारांचा सन्मान
Edited by: विनायक गावस
Published on: November 30, 2023 20:10 PM
views 87  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान ओटवणे येथील श्री रवळनाथाची महती सांगणाऱ्या "शंभो जय जय श्री रवळनाथ" हे भक्तीगीत भाविकांसाठी श्रद्धेचे प्रतिक असुन गौरवशाली ऐतिहासीक परंपरा लाभलेल्या या गावाच्या इतिहासात अजरामर ठरेल असे गौरवोद्दगार सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेमसावंत (बाळराजे) भोसले यांनी काढले. गीतकार ज्येष्ठ कवी, कोकण भूषण कृष्णा रामचंद्र देवळी लिखित "शंभो जय जय श्री रवळनाथ" या व्हिडिओ भक्तिगीताच्या प्रकाशन सोहळयात श्रीमंत बाळराजे भोसले बोलत होते.

यावेळी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले,ओटवणे सरपंच आत्माराम गावकर मानकरी एकनाथ गावकर, बाबाजी गावकर, अण्णा मळेकर, ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सरचिटणीस रामचंद्र उर्फ आबा गावकर, उप सरपंच संतोष कासकर, ओटवणे येथील मंडळाचे समन्वयक दशरथ गावकर, उमेश गावकर, संतोष कविटकर, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सचिव राजाराम वर्णेकर, रवींद्र म्हापसेकर, मनोहर मयेकर, संजय कविटकर, बाळा गावकर, नरेंद्र कविटकर, रामदास पारकर, बाबी देवळी, दत्ताराम गावकर, शेखर गावकर, सुनिल मेस्त्री, प्रभाकर गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

          

ओटवणे येथील रवळनाथ देवस्थानचे सेवेकरी तथा कवी कृष्णा देवळी यांनी ओटवणे देवस्थानसह बांदयाचा बांदेश्र्वर (शिव शंभू तो लिंग रूपाने भूमीतून प्रकटला सदाशिव बांदेकर झाला), डेगवेचा स्थापेश्र्वर (धन्य हा स्थापेश्वर अवतार' आणि 'स्थापेश्वरा शिवसुंदरा), रेडीची माऊली (आरती, अष्टक आणि प्रार्थना), कोलगावचा कलेश्वर (देव कलेश्वर स्वामी माझा!, उभा असे भक्तांचिया काजा), बावळाटची सातेरी माऊली (विश्वतारीणी महन्मगले सातेरी माऊली' आणि 'जय देवी सातेरी जय माऊली आई) आदी देवस्थानच्या महतीवर रचनाबद्ध केलेल्या आरतीसह अभंग गीते सोशल मिडियाच्या माध्यमातून भाविकांना ओढ लावीत आहेत. हजारो भाविकांच्या मुखावाटे निघणाऱ्या या आरतीसह अभंग गितांची सध्या वाहवा होत आहे. कृष्णा देवळी यांनी देवस्थानच्या महतीवर रचनाबद्द केलेल्या आरत्यांसह भक्ती गिते ही त्या त्या गावाची अत्यंत मौल्यवान अशी पुरातन ठेव आहे. 

         

यावेळी कविवर्य कृष्णा देवळी यांनी आपण केवळ देवाचे पाईक असून श्री देव रवळनाथाने माझ्या करवी अभंग गीताच्या माध्यमातून भक्ती रुपी सेवा करवून घेतली. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने धन्य व समाधानी झाल्याचे सांगुन विशेष म्हणजे ४५ वर्षानंतरही ही भरती रचना टिकून आहे. याचे श्रेय रवळनाथाला असुन रवळनाथाच्या प्रेरणेतूनच हे साकार झाल्याने आपण केवळ निमित्त असल्याचे सांगितले. यावेळी या व्हिडिओ भक्ती गीतासाठी योगदान दिलेल्या कृष्णा देवळी यांच्यासह संगीत व गायन केलेले दिप्तेश मेस्त्री, संगीतसाथ भावेश राणे (रेडी), प्रदीप वाळके (तबला व पखवाज), विठ्ठल केळुस्कर (कोरस), ड्रोन फोटोग्राफी चित्रीकरण केलेले ओंकार सावंत (माजगाव), ध्वनी मुद्रण केलेले महेंद्र मांजरेकर (बांदा), व्हिडिओ चित्रीकरण व एडिटिंग केलेले वैभव पारकर, फोटो उपलब्ध केलेले पत्रकार दीपक गावकर या सर्वांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार महेश चव्हाण यांनी केले.