
वेंगुर्ला : तालुक्यातील तुळस जैतिर मंदिर नजीक असलेल्या रमाकांत विष्णू पेडणेकर यांच्या घराला काल २८ डिसेंबर सायंकाळी भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी आज घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. तर पेडणेकर कुटूंब व याठिकाणी भाड्याने दुकान असलेले आपा नागवेकर यांना तात्काळ २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेनेचे हिमांशू परब, समिर शेटकर, उपविभाग प्रमुख नाना राऊळ, प्रशांत गावडे, शाखा प्रमुख किरण सावंत, नामदेव सावंत, गुंडू परब, दादा परब, राजन आरोस्कर आदी उपस्थित होते. यावेळी शैलेश परब यांनी पडणेकर व नागवेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.










