
सावंतवाडी : युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार तथा काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल फेम शहाजीबापू पाटील सावंतवाडीतून कुडाळला रवाना होत आहे. यावेळी भाजप नेते माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून बापूंच गवळी तिठा इथं जंगी स्वागत होणार आहे.
भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने गवळी तिठा इथं दाखल होत आहेत. यातच दीपक केसरकर समर्थक अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शहाजी बापूंच्या स्वागताला उपस्थित राहिलेत. त्यामुळे शहाजी बापूंच्या स्वागताला शहरातील सेना-भाजप एकदम ओक्के पहायला मिळतेय.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, अनारोजीन लोबो, अशोक दळवी, नारायण राणे, राजू बेग, दिपाली भालेकर, अजय सावंत, बंटी पुरोहित, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, संजय वरेरकर, सत्या बांदेकर आदी उपस्थित होते.