अक्षरसिंधुच्या 'शबय'चं घवघवीत यश !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: April 24, 2024 10:20 AM
views 78  views

कुडाळ : गेल्या ३० दशकांहून अधिक काळ आपल्या विविध मालवणी नाटके, एकांकिका मधून कार्यरत असणारी अक्षरसिंधु साहित्य कला मंच कणकवली,सिंधुदुर्ग या सांस्कृतिक संस्थेने मुंबई येथे झालेल्या मालवणी एकांकिका स्पर्धेत प्रथम वर्षाच्या अंतिम फेरीमध्ये शबय एकांकिकीने प्रथम क्रमांक मिळवीत आपले नाव सोनेरी अक्षराने उमटवले. 

लेखक श्री विजय चव्हाण यांनी आपल्या लेखणीतून रुढी,परंपरांतील अविवेकाची होळी आणि विवेकाची शबय ... एकांकिकेमधून दाखवलेले आहे. त्याचप्रमाणे किशोर कदम यांनी या कथेचे योग्य दिग्दर्शन करत कथेला योग्य असा न्याय दिलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय राणे यांनी योग्य आणि कथेला साजेस नेपथ्य देत कथेमध्ये रंजक आणलेली आहे.एकंदरीत एकांकिका प्रथम त्याचप्रमाणे वैयक्तिक लेखक प्रथम , नेपथ्य प्रथम, दिग्दर्शक द्वितीय , स्त्री अभिनय द्वितीय , पुरुष अभिनय तृतीय,असे आपले विविध एकूण सहा मानाची बक्षिसे संस्थेने आपल्याकडे आणलेले आहेत.त्याचप्रमाणे एकांकिकेसाठी प्रकाशयोजना श्री. ऋषिकेश कोरडे यांनी आणि पार्श्वसंगीत श्री आनंद जाधव यांनी अशी मोलाची साथ दिली.एकांकिकेसाठी श्री.विजय चव्हाण ,संजय राणे ,किशोर कदम, मयुर चव्हाण , सोहन सावंत, साबाजी पराडकर ,प्रमोद तांबे,संतोष कदम, रोहित राणे, मयुर जांभवडेकर , उमेश कदम , पार्थ कोरडे,रिया राणे ,पुजा राणे,हर्षदा माळवदे आणि श्रद्धा परब यांनी आपापल्या भूमिकांना न्याय देत एकांकिका प्रथम क्रमांकात आणली.या  सर्व कलाकार ,लेखक,तंत्रज्ञान दिग्दर्शक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे 


मालवणी एकांकिका स्पर्धा - २०२४

अंतिम फेरी निकाल.

१) एकांकिका प्रथम-शबय 

अक्षर सिंधु साहित्य मंच कणकवली.

लेखक - विजय चव्हाण,

दिग्दर्शक - किशोर कदम.

२) द्वितीय - श्यान पण देगा देवा

सृजन द क्रिएशन मुंबई

लेखक - राजेश देशपांडे

दिग्दर्शक - संग्राम लवटे

३) तृतीय - वाॅरंट

अमर क्रिएशन नेतर्डे, सावंतवाडी,

लेखक - गंगाराम गवाणकर

दिग्दर्शक - शेखर गवस

४) उत्तेजनार्थ - जापसाल

श्री.गणेश कलामंच, कणकवली. 

लेखक - विठ्ठल सावंत,

दिग्दर्शक - शेखर गवस.


लेखन प्रथम - विजय चव्हाण

एकांकिका - शबय

लेखन द्वितीय - राजेश देशपांडे

एकांकिका - श्यान पण देगा देवा.


दिग्दर्शक प्रथम - संग्राम लवटे

एकांकिका - श्यान पण देगा देवा.

दिग्दर्शक द्वितीय - किशोर कदम

एकांकिका - शबय


नेपथ्य-संजय राणे

एकांकिका - शबय.


प्रकाश योजना - श्याम चव्हाण

एकांकिका - श्यान पण देगा देवा.


पार्श्वसंगीत - शेखर गवस

एकांकिका - जापसाल.


अभिनय पुरुष प्रथम - विजय मिरगे 

श्यान पण देगा देवा - भू.- म्हातारा.

अभिनय द्वितीय - सत्यवान गावकर

एकांकिका"  जापसाल - भू.मकरंद.

अभिनय तृतीय - रघू भूमिका - शबय.

अभिनय स्त्री प्रथम - प्राजक्ता नेरूळकर, जापसाल 

अभिनय द्वितीय - श्रध्दा परब, शबय.


उत्तेजनार्थ अभिनय.

१) म्हातारी - मोहर

२) गोविंदा - वाॅरंट

३) बाप - जापसाल

४) बाबी - शबय.

प्राथमिक फेरीतील अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र.

१) किसन पेडणेकर - झिला बोल मारे माझ्या वांगडा.

२) स्वप्निल परब - झिला बोल मारे माझ्या वांगडा.

३) तनिष्का राणे - तिनसान

४) महेश वारकर - कोन नाय कोन्चा

५) सायकल हंकारे - आठवणींचो वळेसर.

६) सत्यवान - नटीचा काय ?

७) तुषार डुकरे - आये.