
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेचे भारतीय जनता पार्टीचे, माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या पाठपुराव्याने जुनाबाजार येथील गटार बांधकामाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नगरोत्थान निधीतून या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. गुरूवारी सुधीर आडीवरेकर यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
जुनाबाजार येथील नार्वेकर पाणंद येथे या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. पावसाच्या तोंडावर या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाच्या पाण्याचा फटका नागरिकांना बसू नये म्हणून श्री. आडीवरेकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यावेळी निशू साळगावकर, बाळा नार्वेकर, सुनील नेवगी, सुनील आडीवरेकर, नागेश जगताप, सुदेश नेवगी, मंदार पांगम, पिंटू गवंडळकर आदींसह जुना बाजार येथील नागरिक उपस्थित होते.