LIVE UPDATES

सेवा माझ्या रक्तातला गुणधर्म, तो आजन्म जपणार : विशाल परब

वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाला वॉशिंग मशीन आणि मेडिकल कीट प्रदान
Edited by: दिपेश परब
Published on: July 09, 2025 18:11 PM
views 113  views

वेंगुर्ला :  विशाल सेवा फाउंडेशन आणि विशाल परब मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचे कपडे तसेच चादरी स्वच्छ करता याव्यात यासाठी वॉशिंग मशीन व मेडिकल किट देण्यात आले. तसेच यावेळी युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटपही करण्यात आली. 

      याप्रसंगी बोलताना विशाल परब म्हणाले, आयुष्यात चढाव उतार हे यायचेच. परंतु हे जीवन म्हणजे जणू क्रिकेट आहे, थांबला तो हुकला. सेवा हेच संघटन ही शिकवण घेऊन मी माझ्या सामाजिक जीवनात वावरलो. गोरगरिबांची सेवा हाच माझ्या रक्ताचा धर्म असून तो आयुष्यभर जपणार, आता थांबणार नाही. चांगल्या कामात परमेश्वर मला निश्चितपणे बळ देईल असा पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. 

    या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशाल परब यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते पुन्हा एकदा समाजसेवेचा वसा घेऊन कार्यरत झाल्याचे चित्र दिसून येत असून सिंधुदुर्गात या स्तुत्य उपक्रमाची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी विशाल सेवा फाउंडेशनचे केतन आजगावकर, प्रशांत नाईक, गणपत राऊळ , अजित नाईक, सचिन शेट्ये, राजू रगजी, श्रीकांत राजाध्यक्ष, दीपेश केरकर, बाबू टेमकर, निलेश मांजरेकर, साईप्रसाद नाईक, राजेश करंगुटकर, प्रसाद शिंदे, संदीप गावडे, विनायक मांजरेकर आदी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. यावेळी डॉ. गणेश गुट्टे, डॉ. निखिल, इन्चार्ज सिस्टर पी.एफ. डिसोजा तसेच ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.