संवेदना जागृत होतात तेव्हा..!

जखमी माकडाला वाचवण्यासाठी वनविभागाची 'क्विक' ऍक्शन
Edited by: लवू परब
Published on: August 11, 2024 06:53 AM
views 111  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरात एका वीज ट्रान्सफार्मवर बसलेला माकड विद्युत झटक्यात खाली कोसळला आणि विव्हळत आहे ही बाब दोडामार्गचे प्रभारी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना समजताच त्यांनी 'क्विक'  ऍक्शन घेत जखमी माकडाला अधिक उपचारासाठी वनविभाग कार्यालयात हलविले आहे. जखमी माकडाबाबत कल्पना मिळताच काही क्षणात वनविभागाने दाखविलेली संवेदना कौतुकास्पद ठरत आहे. 

दोडामार्गमधील शिक्षक वसाहतच्या वीज ट्रान्सफार्मवर जवळ रविवारी सकाळी मोठा स्फोट झाल्यागत आवाज येत वीज गेली त्यानंतर वायरमन यांना कल्पना देताच त्यांनी तिथे येत दुरुस्ती केली पण खाली माकडं पडलेला दिसला नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले तर तो जीवंत होता त्यांनी तात्काळ दोडामार्गचे प्रभारी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना कल्पना दिली त्यांनी वनकर्मचारी श्री. कुबल यांसह टीमला घटनास्थळी पाठवले आणि सदर माकडाला जीवनदान देण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयाकडे नेण्यात आले. पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या मदतीने त्यावर उपचार होतील असे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.