सेना-भाजपात श्रेयवाद ; न.प. ताफ्यात फायर फायटर दाखल

अॅम्ब्युलन्सचं श्रेय कोण घेणार ? ; नागरिकांचा सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: February 24, 2023 14:20 PM
views 380  views

सावंतवाडी : नगरपरिषदेसाठी अग्निशामक केंद्र सुरू करण्याच्या हालचाली राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सुरू झाल्या असून आज 55 लाख रुपये किमतीचा फायर फायटर नगरपरिषदेमध्ये दाखल झाला आहे अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी दिली. तर संजू परब नगराध्यक्ष असताना त्यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे. उगाच मंत्री केसरकरांचे गुणगान गाऊन बाबू कुडतरकर यांनी जनतेची दिशाभूल करू नये. अग्निशामक बंबाचे सर्व श्रेय भाजपा आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांनाच जाते असा दावा माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी केला आहे. न.प.च्या ताफ्यात फायर फायटर दाखल झाल्यानंतर सेना-भाजपात श्रेयवादावरुन युद्ध रंगल असताना  आमदार निधीतून 9 महिन्यांपूर्वी दिलेल्या व सध्यस्थितीत धूळ खाणाऱ्या  रूग्णवाहिकेच श्रेय शिवसेना-भाजपाचे नगरसेवक घेणार का ? असा सवाल नागरिकांकडून केला जातोय. 

अचानक आग लागल्यास अग्निशामक बंब नसल्यामुळे आग विझवण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या केवळ सावंतवाडी नगर परिषदेत नव्हे तर आसपासच्या भागांमध्ये घडणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी अद्ययावत अग्निशामक केंद्र सुरू करण्याची घोषणा तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात 55 लाख रुपये किमतीचे फायर फायटर आज दाखल झाले आहे. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. तर उंच इमारतीला आग लागल्यास त्यासाठी शिडी यापूर्वी नगर परिषदेच्या ताफ्यात दाखल आहे. तर अग्निशामक केंद्र ही सुरू होणार आहे.  केसरकर यांच्या प्रयत्नामुळे फायर फायटर दाखल झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे शिवसेना शहरप्रमुख माजी नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी सांगितले. तर  संजू परब नगराध्यक्ष असताना त्यांनी शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे. उगाच मंत्री केसरकरांचे गुणगान गाऊन बाबू कुडतरकर यांनी जनतेची दिशाभूल करू नये. अग्निशामक बंबाचे सर्व श्रेय भाजपा आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांनाच जाते असा दावा माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी केला आहे. 

दरम्यान, आमदार निधीतून 9 महिन्यांपूर्वी मे महिन्यात रूग्णवाहिक देण्यात आली. दीपक केसरकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात याचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, सध्या रूग्णवाहिका आहे पण पुर्णवेळ ड्रायव्हर नाही अशी अवस्था या 'लाईफ लाईन'ची झालीय. लोकार्पण होऊन आज ९ महिने झालेत. पण, या ९ महिन्यात ९ वेळा सुद्धा या रूग्णवाहिकेचा वापर रूग्णसेवेसाठी झालेला नाही. त्यामुळे या धूळ खाणाऱ्या  रूग्णवाहिकेच श्रेय शिवसेना-भाजपाचे नगरसेवक घेणार का ? असा सवाल नागरिकांकडून केला जातोय.