कला - विज्ञान महाविद्यालय सावर्डेत स्वसंरक्षण कार्यशाळा

Edited by: मनोज पवार
Published on: July 30, 2025 11:34 AM
views 96  views

रत्नागिरी : कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे येथे महिला विकास कक्ष आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेचे प्रमुख आयोजन क्रीडा भारती, कोकण प्रांत, रत्नागिरी  यांनी केले होते. स्वसंरक्षणाचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा व संकटसमयी योग्य प्रकारे प्रतिक्रिया देता यावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून सुश्री सोनाली वरांडे (ज्युडो कराटे व मार्शल आर्ट कोच) यांनी मार्गदर्शन केले. त्यांना समीर पवार, मार्शल आर्ट कोच , समृद्धी चव्हाण स्टेट खेळाडू आणि पार्थ तोडणकर, प्रशिक्षक  यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह विविध तंत्र शिकवून विद्यार्थिनींना सहज आत्मसात करता येतील अशा स्वसंरक्षणाच्या कृती दाखवल्या. विद्यार्थिनींनीही अत्यंत उत्साहाने कार्यशाळेत सहभाग घेतला व सराव केला.

या कार्यशाळेसाठी पूजा निकम, माजी सभापती, पंचायत समिती यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी निशा आंबेकर,  उपाध्यक्ष, क्रीडा भरती, उत्तर रत्नागिरी जिल्हा, ललित चितळे, संयोजक , क्रीडा भारती,  उत्तर रत्नागिरी जिल्हा , सई महाडिक , सहकेंद्रप्रमुख कोकण प्रांत , उपस्थित होते. सावर्डे पोलीस ठाण्याच्या  कॉन्स्टेबल स्नेहा घोसाळकर  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  त्यांच्यासोबत कॉन्स्टेबल सारिका जाधव उपस्थित होत्या. 

कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य . टी. वाय. कांबळे,  IQAC चे सदस्य, तसेच इतर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. महिला विकास कक्षाच्या समन्वयक  डॉ. दीप्ती शेंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. आणि कार्यक्रमाचे आभार प्रा. अवनी कदम यांनी केले.