स्व. गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सवानिमित्त डॉ. श्याम जोशी यांचे व्याख्यान

Edited by:
Published on: January 25, 2025 15:15 PM
views 220  views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मांदिवली ता. दापोली या विद्यालयात स्व.गोविंदरावजी निकम साहेब जयंती महोत्सव उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दि. १६ जानेवारी  ते २४ जानेवारी दरम्यान जयंतीमहोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये दि. २२ जानेवारी रोजी  बाह्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवृत्त प्राचार्य डॉ. शाम जोशी यांचे 'शिकायला शिका' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला स्व. गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन  करण्यात आले. यानंतर विद्यालयाचे सहा शिक्षक श्री. सुनिल गुढेकर यांनी व्याख्याते डॉ. शाम जोशी यांची ओळख करून दिली. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.मंगेश कोकीळ यांनी प्रास्ताविक केले. साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले डॉ. शाम जोशी हे डी. बी. जे. महाविद्यालय चिपळूणचे निवृत्त प्राचार्य आहेत. त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या व्याख्यानामध्ये का शिकावे ? तसेच कसे शिकावे ? याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून प्रगती कशी साधावी. याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले जीवन समृद्ध कसे करावे. तसेच भाषिक कौशल्ये कशी आत्मसात करावी. याविषयी मार्गदर्शन केले. निसर्ग हा माणसाचा मित्र आहे आपण त्याच्यासोबतची मैत्री वृद्धीगत केली पाहिजे. तसेच शेतीशिवाय मानवाला पर्याय नाही असे सांगितले 

या कार्यक्रमाला स्कूल कमिटी चेअरमन श्रीम. गीतांजलीताई वेदपाठक, सदस्य श्री. संतोष पिंपळकर, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचलन श्री. सुनील गुढेकर यांनी केले.