साटेली - भेडशी केंद्रशाळेच्या वेदांत पाटीलची नवोदय विद्यालयासाठी निवड...!

Edited by: संदीप देसाई
Published on: June 24, 2023 21:38 PM
views 99  views

दोडामार्ग : साटेली - भेडशी केंद्रशाळेने जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. केंद्रशाळेचा विदयार्थी वेदांत तुकाराम पाटील याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. 

त्याला दीपक दळवी व संजीवनी आवडण यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक पूनम पालव,  शिक्षक संपदा दळवी, रामा गवस, पालक, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांच्यासह गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.