बांदा केंद्रशाळेच्या स्वरा बांदेकरची नॅशनल‌ अबॅकस स्पर्धेसाठी निवड

Edited by: संदीप देसाई
Published on: December 09, 2023 19:00 PM
views 60  views

बांदा : प्रोऍक्टिव्ह अबॅकस कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेत इयत्ता चौथीत शिकणारी व बांदा येथील एकलव्य अबॅकस क्लासची विद्यार्थ्यांनी स्वरा दीपक बांदेकर हिने विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून २५जानेवारी २०२४मध्ये नॅशनल  स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

  स्वरा हिला बांदा येथील एकलव्य अबॅकस च्या शिक्षिका स्नेहा केसरकर हिचे मार्गदर्शक मिळत आहे.स्वराने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्ष संपदा सिध्दये मुख्याध्यापिका उर्मिला मोर्चे, केंद्र प्रमुख संदीप गवस यांनी अभिनंदन केले आहे.

या विद्यार्थ्यांनीला बांदा केंद्र शाळेतील  शिक्षक शांताराम असनकर,सपना गायकवाड,स्नेहा घाडी,रसिका मालवणकर, रंगनाथ परब,जे.डी.पाटील, प्रदिप सावंत, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, मनिषा मोरे व वडील दिपक बांदेकर व आई  साक्षी बांदेकर यांचे  वर्गाचे मार्गदर्शन लाभले. स्वराने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.