महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी सदानंद दत्ताराम रावराणे यांची निवड

जिल्ह्यातील शिक्षक संघटना, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्याकडून होतंय अभिनंदन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 22, 2023 18:00 PM
views 172  views

वैभववाडी : एडगाव गावचे सुपुत्र सदानंद दत्ताराम रावराणे यांची महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या मुंबई येथील झालेल्या बैठकीत ही बिनविरोध निवड झाली.

 सदानंद दत्ताराम रावराणे हे मुळ एडगावचे आहेत. सध्या ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचे बहुमुल्य काम आहे. मुंबई येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा मिलिंद विद्यालय पवईचे अध्यक्ष आहेत.  वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना उत्कृष्ट संस्थाचालक तसेच समाजभूषण अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभव व योगदान लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल जिल्ह्यातील शिक्षक संघटना, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्याकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.