33 व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेकरिता सिंधुदुर्गातील गुन्हे शोध श्वान रेम्बोची निवड

महाराष्ट्रातील 433 मधून टॉप 10 डॉगची निवड | त्यामध्ये सिंधुदुर्गातील रेम्बोची निवड
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 13, 2023 12:08 PM
views 397  views

कणकवली : ३३ व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेकरिता डॉग शो साठी महाराष्ट्रातील 10 डॉग ची निवड करण्यात आली त्यात सिंधुदुर्गातील गुन्हे शोध शॉन रेम्बो ची निवड करण्यात आली आहे. तसेच या आधी गोरेगाव येथे झालेल्या महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनासाठी सिंधुदुर्गातील गुन्हे शोध श्वान रेम्बोची निवड झाली होती.


वानवडीतील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन (एसआरपीएफ) येथे आयोजित करण्यात आलेल्या ३३ व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली जिंकली आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील श्वानपथकाने या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता


तसेच 2 जानेवारी  2023 रोजी 63 व्या महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनासाठी महाराष्ट्रातून 433 श्वान  मधून टॉप 10 डॉग ची निवड झाली त्यामध्ये सिंधुदुर्गातील गुन्हे शोध शॉन रेम्बो ची निवड करण्यात आली आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपालभगतसिंग कोषारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यावेळी त्यांना सर्व श्र्वानानी सलामी दिली. त्यामुळे सिंधुदुर्गाचे नाव आता महाराष्ट्रात गाजत आहे. 

श्वान  रेम्बो गुन्हे शोधक  डोबरमन जातिचा श्वान असून श्वान हस्तक  - अमित वेंगुर्लेकर सुमीत देवळेकर आहेत

डॉग रेम्बो याने 2018 मध्ये श्वान प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषन विभाग शिवाजी नगर पुणे येते 9 महीन्याच ट्रेनिंग पूर्ण केला आहे.