कळणे नूतन विद्यालयाच्या आयुष वालावलकरची कोल्हापूरातील विभागीय स्पर्धेसाठी निवड

Edited by: संदीप देसाई
Published on: October 18, 2023 15:36 PM
views 115  views

दोडामार्ग : सागंली येथे होणा-या विभागीय शालेय मैदानी क्रिडा स्पर्धेसाठी  कळणे नूतन विद्यालयाच्या आयुष गणेशप्रसाद वालावलकर याची निवड झाली आहे.

          17 वर्षाखालील थाळी फ़ेक शालेय मैदानी जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा ओरस येथे नुकत्याच घेण्यात आल्या. यावेळी नूतन विद्यालय कळणे  शाळेचे विद्यार्थी 14 वर्षाखालील थाळी फ़ेक मध्ये पांडूरंग गणपत धुरी याची, तर 17 वर्षाखालील थाळीफ़ेक स्पर्धेत आयुष गणेशप्रसाद वालावलकर याची निवड झाली होती. या जिल्हास्तरीय स्पर्धेत आयुष वालावलकर यानी दुसरा क्रमांक पटकावीला. तर  पांडूरंग गणपत धुरी हा स्पर्धेत तिसरा आला.

        21 ते 23 ऑक्टोबर 2023 मध्ये सांगली येथे होणा-या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत आयुष गणेशप्रसाद वालावलकर याची निवड झाली. 

        या दोन्ही विद्यार्थाना शाळेचे मुख्याधापक तथा क्रिडा शिक्षक महेंद्र देसाई, व सहा. शिक्षक संजय तायवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मोहनराव देसाई, सस्था पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर, पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.