
सावंतवाडी : ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडीच्या व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूजा मधूकर शिंदे यांची शिक्षक भरतीत Z.P सावंतवाडी शाळा नं - 4 येथे शिक्षक पदी निवड झालीय. ज्ञानसिंधू प्रबोधिनीचं पूजा यांना लाभलेलं मार्गदर्शन मोलाचं ठरलं.
बहुप्रतिक्षित असलेल्या शिक्षक भरतीचे समुपदेशन दिनांक 23 व 24 मे रोजी पार पडले. संपूर्ण राज्यभरातून 2 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षक भरती (TAIT) ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत ज्ञानसिंधु प्रबोधिनी, सावंतवाडीच्या पूजा मधूकर शिंदे या OPEN Catagory मधून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येतं जिल्ह्यासोबतच ज्ञानसिंधू प्रबोधिनीचे नाव मोठे केलं आहे. कुडाळ तालुक्यातील वसोली या गावच्या असलेल्या पूजा शिंदे गेली 4 वर्ष MPSC च्या अभ्यासासोबत ज्ञानसिंधू प्रबोधिनी येथे शिकविण्याचे देखील काम करत आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक होतंय.