
सिंधुदुर्गनगरी : चोरीस गेलेले मोबाईल परत संबंधितांना मिळऊन देण्यात सिंधुदुर्गनगरी पोलिसांना चांगले यश येत आहे.आपल्या हद्दीतील ५ मोबाईल धारकांना त्यांचे हरवलेले फोन शोधून परत देण्यात आले आहे.
भारत सरकारव्दारे मोबाईल चोरी / हरवणे याबाबतच्या तक्रारीबाबत मोबाईल शोधून तो मोबाईल धारकांना परत मिळवून देण्याकरीता Central Equipment Identity Register (CEIR) हे ऑनलाईन पोर्टल विकसित केलेले आहे. सदर पोर्टलव्दारे ज्या व्यक्तींचे मोबाईल गहाळ होतात किंवा चोरीस जातात त्याची माहिती https://www.ceir.gov.in या वेबसाईटव्दारे Central Equipment Identity Register या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस विभागाकडून त्याबाबत तांत्रिक पध्दतीने सदर मोबाईल शोधून संबंधित मोबाईल धारकांना योग्य त्या तजविजीने परत केला जातो. याबाबत मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, मा. अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे श्री मनीष कोल्हटकर प्रभारी अधिकारी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे व पोलीस कॉन्स्टेबल 508 योगेश मुंढे यांनी 05 मोबाईल फोन हस्तगत करून मूळ तक्रारदार यांना परत केलेले आहेत.
तरी सर्व नागरिकांना निवेदन करण्यात येते की, मोबाईल गहाळ अगर हरवला किंवा चोरीस गेला तर तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी केले आहे.