
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक निवडणुकीचे मतदान काल दोन डिसेंबर रोजी शांततेत पार पडली. यानंतर सायंकाळी उशिरा मतपेट्या या कणकवली तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये बंद करून ठेवण्यात आले आहेत. या स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच्या बाजूने आणि आत मध्ये 24 तास पोलिसांचा पहारा असणार आहे.
21 डिसेंबरला निकाल असल्याने उमेदवारांची आता धाकधूक आणखीनच वाढली आहे. प्रत्येक जण विजयाचा विश्वास व्यक्त करत आहे. मात्र, येत्या 21 तारीखला हे चित्र स्पष्ट होईलच. तूर्तास कणकवली तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये उमेदवारांचे भविष्य बंद झाले आहे.










