राष्ट्रीय आविष्कार अभियानतर्फे विज्ञान अभ्यास सहलीचे आयोजन

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केलं कौतुक
Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2023 15:10 PM
views 127  views

सावंतवाडी : राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपुर, पुरस्कृत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. 


या सहलीत जिल्हयातील वैज्ञानिक माहिती देणारी केंद्रे व विविध उद्योग संस्थांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये पंचम खेमराज महाविद्यालयातील प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या प्रयोगशाळा, फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यातील फळ बागायतीची विविध तंत्रे, कुडाळ औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योगधंदे, प्रदुषण तसेच हवा, पाणी,माती यांचे परीक्षण विषयक माहिती देणारी गडार्क टेस्टींग लॅब,  वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूरपार येथील  विविध प्रयोग यांची माहिती देण्यात आली.  


या उपक्रमाचे नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या अनुपमा तावशीकर यांच्या अध्यक्षतेखाली व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सचिव प्रकाश कानुरकर, उपाध्यक्ष रघुनाथ कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यात वाहतुक नियोजन कणकवली तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी केले. तसेच सत्यपाल लाडगावकर, देवगड, अनंत साईल, कुडाळ, संजय तुळसकर, वैभववाडी, ऋषिकेश गावडे, सावंतवाडी, मिलिंद गावकर, मालवण, संतोष पवार,नेहा सावंत, वेंगुर्ला, राजाराम फर्जंद दोडामार्ग यांनी तालुका समन्वयक तसेच मार्गदर्शक म्हणुन काम पाहिले.   


याप्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सहलीत सहभागी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन कौतुक केले व विज्ञान मंडळाच्या अशा विविध उपक्रमांना यापुढेही सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.