
सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी, मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे 50 व्या विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून देखील विविध शाळांनी देखील सहभाग नोंदविला.
विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय हा आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे होता, यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली उपकरणे सादर करण्याची संधी त्यांना मिळाली.
दरम्यान मिलाग्रीस शाळेच्या माजी विद्यार्थी सौ.अर्चना घारे-परब यांनी या प्रदर्शनास भेट दिली. सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या उपकरणांची माहिती जाणून घेतली. तेव्हा त्यांनी शाळेतील जुन्या आठवणीना देखील उजाळा दिला आणि सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच उत्कृष्ट आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले आणि शुभेच्छा देखील दिल्या.
या वेळी विद्यालयाचे प्राचार्य रिचर्ड सालदाना यांनी त्यांचे स्वागत केले, या प्रसंगी उपप्राचार्य आणि गणिताचे विषयाचे शिक्षक राऊळ मॅडम तसेच क्रीडाशिक्षक मोरे सर व अध्यापिका दीपा वारंग, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा रिद्धी परब, शहरध्यक्षा सायली दुभाषी, ग्रामपंचायत सदस्या गौरी गावडे, तसेच नोबेर्ट माडतीस आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासनाने नेमलेले स्वयंसेवक, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.