
दोडामार्ग : जिल्हा परिषद शिक्षण विभाग सिंधुदुर्ग व पंचायत समिती दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग तालुकास्तरीय 52 वे विज्ञान प्रदर्शन मंगळवार 3 डिसेंबर ते 05 डिसेंबर रोजीपर्यंत नवदुर्गा माध्यमिक विद्यालय आयी येथे आयोजित केले आहे.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित श्री नवदुर्गा माध्यमिक विद्यालय आयी याठीकाणी 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवार 03 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता उदघाटन होणार आहे. तसेच 04 डिसेंबर रोजी विविध स्पर्धा व 05 दिसमेंबर रोजी 12.00 वाजता पारितोषिक वितरण, समारोप होणार आहे.