तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात RPDचे उल्लेखनीय यश

अस्मी मांजरेकर वक्तृत्वमध्ये प्रथम तर योगेश जोशी प्रतिकृतीमध्ये द्वितीय
Edited by: विनायक गावस
Published on: December 06, 2023 19:37 PM
views 131  views

सावंतवाडी : देशातील तंत्रज्ञानामध्ये नविन उपक्रमांची भर व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती व्हावी या हेतूने पंचायत समिती सावंतवाडी यांचेकडून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२३-२४ चे आयोजन कलंबिस्त हायस्कूल, कलंबिस्त  सावंतवाडी येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज तर्फे चलप्रतिकृतीमध्ये प्राथमिक स्तरातून आरोग्य - दळणवळण व वाहतूक या विषयावर सुखदायिनी कचरागाडी हि चलप्रतिकृती प्रकल्प सादर केला होता. तसेच वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यामध्ये सहभाग घेतला होता. यापैकी वक्तृत्व स्पर्धेत कु. अस्मी प्रवीण मांजरेकर हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच कु. योगेश विवेकानंद जोशी यांच्या सुखदायिनी कचरागाडी हि चलप्रतिकृतीने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. याच बरोबर उच्च माध्यमिक गटात प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रशालेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

         

 या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक श्री.पी.एम.सावंत , पर्यवेक्षिका श्रीम. बी.आर.चौकेकर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले व जिल्हा स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.