
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सावर्डेतील प्राथमिक शाळेमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या सुंदर प्रतिकृती तयार केल्या होत्या व त्या तयार केलेल्या प्रतिकृती विषयी माहिती देखील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सांगितली.या स्पर्धेमध्ये एक ते चार क्रमांक काढण्यात आले.प्रथम क्रमांक- इयत्ता तिसरी श्लोक जाधव, समर्थ,सोनवणे दर्शन कदम, गोरक्ष मिरगल, द्वितीय क्रमांक -इयत्ता दुसरी आरव क्षीरसागर, प्रियांश जाधव
तृतीय क्रमांक -इयत्ता पहिली विहान राजीवले उत्तेजनार्थ -इयत्ता तिसरी प्रसाद शिरकर, तनय भंडारी ,अथर्व भंडारी,इयत्ता चौथी प्रज्वल भोसले.या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शकील मोडक, सुहास भंडारी, अनिल रेडेकर, सतीश वारे, राजश्री रसिका सुर्वे ,सेजल साळवी, अक्षता घाग, प्रणिता दिंडे, सोनाली राठोड , मनिषा शिंदे, स्मिता सावंत, पूनम चांदेकर, रूपाली कुंभार, सायली शिर्के, योगिता गावडे, गायत्री वनकुते, गायत्री साठे, श्रुती कांबळे, पूनम भुवड, स्नेहल नवरंग, संजना चव्हाण, शुभांगी पवार, आदिती बागवे आदी उपस्थित होते.