
बांदा : दिवाळीच्या सुट्टीनंतर २०२५-२६या शैक्षणिक वर्षातील द्वितीय सत्राची सुरवात शुक्रवार पासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उत्साहाने झाली.या दिवशी जिल्हा परिषद घारपी शाळेतील विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.गेले १५दिवस बंद असलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या.
दुसऱ्या शैक्षणिक सत्रात शैक्षणिक सहल,वनभोजन कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव, विज्ञान प्रदर्शन, स्काऊट गाईड मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ, अभ्यास दौरा, नवोदय व विविध स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहेत. अशा नानाविध उपक्ररमांची रेलचेल असणारे द्वितीय सत्र विद्यार्थ्यांना आनंददायी ठरो यासाठी घारपी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मुख्याध्यापक जे.डी.पाटील सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, आशिष तांदुळे,अ़गणवाडी सेविका संजना गावकर मदतनीस अमृता कविटकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.










