
सावंतवाडी : आज सकाळी नऊच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मडगाव येथे जाणाऱ्या ट्रेनमधून खाली उतरताना तीन शाळकरी मुली प्लॅटफॉर्मवर पडून जखमी झाल्या. त्यातील दोन मुलींच्या डोक्याला व तोंडाला मार लागला असून त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती रेल्वे टेशन येथील स्टॉल धारक रेडीज यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव तत्काळ दिली असता सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व रूपा मुद्राळे या अपघातग्रस्त तिन्ही मुलींना उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर यातील दोन मुलींना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या मुली मळगाव हायस्कूल येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी कणकवली येथून आल्या होत्या. सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे उतरत असताना चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केल्याने तोल जाऊन त्या खाली पडल्या. या घटनेची माहिती त्यांच्या प्रशिक्षकांना माहिती मिळताच प्रशिक्षक प्रताप परब व वसंत तावडे यांनी सदर मुलींना आपल्या गाडीमध्ये घालून उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. मुलींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी मदत करणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे प्रशिक्षक तसेच शिक्षक यांनी कौतुक करून रवी जाधव व रूपा मुद्राळे यांचे आभार मानले.