
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत जि. प. शाळा कोलगाव नं.२ च्या २ विद्यार्थिनींनी आपले स्थान पटकावत शाळेची आणि जिल्ह्याची मान उंचावली आहे.
आराध्या कृष्णकांत परब हिने जिल्ह्यात १२ वे, तर वेदश्री वैभव परब हिने २६ वे स्थान मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या दोघींच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थिनींनी घेतलेली कठोर मेहनत यांना जाते.