Scholarship ; पद्मनाभ पाटणकर सावंतवाडी तालुक्यातून 8 वा !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 06, 2024 08:16 AM
views 219  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत घेण्यात आलेल्या सन २०२४पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती  परीक्षेत मळेवाड श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा नं. २ चा विद्यार्थी पद्मनाभ विद्याधर पाटणकर हा जिल्हा गुणवत्ता यादीत ३९ वा तर सावंतवाडी तालुक्यातून ८ वा आला.  पद्मनाभ पाटणकर याला वर्गशिक्षक विजय गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, केंद्र प्रमुख म. ल. देसाई, मळेवाड कोंडुरे मिनल पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, शाळेचे मुख्याध्यापक लवू सातार्डेकर, पदवीधर शिक्षक शामसुंदर कळसुलकर, शिक्षिका शामल कसुलकर, जयश्री हरमलकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी अभिनंदन केले आहे.