
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील जि. प. शाळा बोडदेने शिष्यवृत्ती परीक्षेत सलग तीन वर्षे यशस्वी सातत्य राखले. यावर्षीही दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. प्रशालेचा शिक्षणविभागाच्यावतीने नुकताच गौरव करण्यात आला.
शिष्यवृत्ती परिक्षेत बोडदे शाळेचे दोन विद्यार्थी सावली राजन नाईक जिल्ह्यात 23 वी व उर्वी सिध्देश मणेरीकर,जिल्ह्यात 46वी आल्याबद्दल जिल्हा शिक्षण विभागामार्फत प्रदीपकुमार कुडाळकर, शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या हस्ते व रुपाली तेलतुंबडे गटशिक्षणाधिकारी दोडामार्गयांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचा, मुलांचा व खोराटे व समीर घाडी यांच्या कामाचा गौरव करण्यात आला . या शाळेच्या व मुलांच्या गौरवाबद्दल सुर्यकांत नाईक, केंद्रप्रमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या भक्कम पाठींब्यामुळे साटेली भेडशी केंद्र सतत प्रगतीशील आहे.
बोडदे शाळेच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साक्षी नाईक , उपाध्यक्ष रुपाली गवस, फटी नार्वेकर, रमेश दळवी , सुनिल नाईक, महादेव गवस, दिपीका घाडी, सुजाता गवस, मोहन गवस,रमेश गवस, नारायण गवस, चंद्रकांत जाधव, गूरु जाधव, श्रीकृष्ण गवस, गोविंद नाईक, महेश पारधी यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले आहे.