डॉन बॉस्कोच्या तब्बल 17 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप !

अधीश जंगले सिंधुदुर्गात पहिला
Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 04, 2024 13:27 PM
views 335  views

सिंधुदुर्ग : नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकाला मध्ये डॉन बॉस्को व ज्युनिअर कॉलेज, ओरोस च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले आहे. पूर्व माध्यमिक स्तरातून ( इयत्ता ५  वी )  एकूण 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

त्यातील कु. अधीश मोहन जंगले याला राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत राज्यात 5 वा क्रमांक प्राप्त झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून त्याने प्रथम येण्याचा मान  पटकाविला आहे.  तर कुमार श्रीयांस श्रीकृष्ण सावंत याला ग्रामीण गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक तर कुमार विघ्नेश प्रशांत मराळ याला अकरावा क्रमांक प्राप्त झाला आहे. 

पूर्व माध्यमिक ( इ.पाचवी) स्तरातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे -  


1. कु. अधीश मोहन जंगले ( राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत पाचवा व जिल्ह्यात प्रथम) 

    2.  कुमार श्रीयांस श्रीकृष्ण सावंत ( ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती - चौथा क्रमांक) 

3. कुमार  विघ्नेश प्रशांत मराळ ( ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती - अकरावा क्रमांक) g

4. वेदश्री नितीन शिरसाट

5. वेदिका नितीन शिरसाट

6. कु.  विघ्नेश विक्रांत कामत

7. कु. गौरवी सिद्धेश देवलकर

8. कु. सूचित सचिन ओरोसकर

9. कु. वैष्णवी सचिन सावंत

10. कु. हर्षवर्धन बाळकृष्ण खानोलकर 

11. कु. आराध्य रोहन देसाई

12. कु. अथर्व दिनेश सावंत

माध्यमिक स्तरातील (इ.आठवी) शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे -

1. कु. युक्ता अनंत घाडी

2. कु. डिंपल मोहन कावले

3. कु. वैभवी सचिन सावंत

4. कु. आर्यन सचिन परब

5. कु. अनुजा अनिल ठोसरे


सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. विनोद राणे यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.