शिष्यवृत्तीत चैतन्य दळवीचं घवघवीत यश !

ग्रामीण सर्वसाधारण विभागात सिंधुदुर्गात अव्वल
Edited by: साहिल बागवे
Published on: July 04, 2024 07:57 AM
views 393  views

कणकवली : आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मधील विद्यार्थी कु.चैतन्य श्रीकांत दळवी याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण विभागात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या यशात त्याला स्वामी ट्युटोरियल कणकवली च्या संचालिका सुनेजा निखिल साटम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल चैतन्यचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.