आचिर्णे विद्यालयात कर्मवीर जयंतीनिमित्त शिष्यवृत्ती कार्यशाळा

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 13, 2023 17:43 PM
views 73  views

वैभववाडी : आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात शुक्रवारी(ता.२२) एक दिवसीय जिल्हास्तरीय 'एनएमएमएस' व शिष्यवृत्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पंढरीनाथ राणे मार्गदर्शन करणार आहेत.

       रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त श शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. गणितीय सुत्रे व बुद्धिमत्ता विषयाच्या क्लुप्त्यांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

     या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी चंद्रशेखर कारेकर, गणेश सावंत यांच्याशी आगाऊ संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आचिर्णे विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.