
दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेमध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूलने घवघवीत यश संपादन केले. इयत्ता आठवीतील कुमारी चिन्मयी जयसिंग खानोलकर 264(88.00%) ही शहरी सर्वसाधारण या प्रकारातून राज्यात 20 वी व जिल्ह्यात प्रथम आली, तर चिन्मय हेमंत सावंत 214(71.33%) जिल्ह्यात 12 वा, गिरीजा बाबुराव धुरी 208(69.33%) जिल्ह्यात 17वी आली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष विकास भाई सावंत, उपाध्यक्ष दिनेश नागवेकर, खजिनदार सी एल नाईक , सचिव व्ही बी नाईक सर, मुख्याध्यापक अरविंद साळगावकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ सदस्य व पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.