सावंतवाडीचा 'फायर फायटर' अखेर मैदानात !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 07, 2026 12:52 PM
views 204  views

सावंतवाडी : गेले काही दिवस सावंतवाडी नगरपरिषदेचा अग्निशमन दलाचा बंद तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला होता. यामुळे मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागलं होतं. नगरपरिषदेच्या माध्यमातून नुकतीच काही काळासाठी खाजगी बंबाची देखील सोय करण्यात आली होती. मात्र, न.प.चा बंद पडलेला 'फायर फायटर' दुरूस्त झाला असून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.

अचानक आग लागलेली असताना तांत्रिक बिघाड होऊन हा बंब नादुरुस्त झाला होता. यामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली होती. यानंतर शहरात व शहरात लगत दोन घटना घडल्यान बंबाची उणीव भासली होती. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेची सोय तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती. मात्र, 'फायर फायटर' असणाऱ्या बंबाची उणीव जाणवत होती. अखेर हा बंब दुरूस्त झाला असून तो पालिकेच्या आवारात दाखल झाला आहे. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.