
दोडामार्ग : दोडामार्ग केंद्रशाळा नं १ या शाळेतील मुलांनी अतिशय उत्साहात आणि आनंदात रंगपंचमी साजरी केली. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून तसेच पाणी वाया न घालवता पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश दिला.या उपक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून फुलांपासून रंग तयार करण्याची माहिती घेत एकमेकांना गुलाल लावून हा सण साजरा केला.
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करत विद्यार्थ्यांनी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंग, फुलांच्या पाकळ्या, हळद, आणि वनस्पतीजन्य रंगांचा वापर केला.शाळेमध्ये रंग खेळण्यासोबतच या सणाचे सांस्कृतिक महत्त्व देखील विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून समजावून सांगण्यात आले.या उपक्रमातून सर्व काही विसरून प्रेम ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.मुख्याद्यापक जयसिंग गावित शिक्षिका एकता नाईक, वर्षा काळे, मनीषा रेडकर यांनी सुयोग्य नियोजन केले तर या उपक्रमात पालकांचे योगदान मोठे लाभले आहे.










