सावंतवाडीकरांचा इयर एंडींग होणार गोड | ️'इनरव्हील महोत्सवा'चे शानदार आयोजन

'कोकणसाद LIVE' मिडीया पार्टनर | 3 वर्षांचा 'सांस्कृतिक बॅकलॉग' भरून काढणार !
Edited by: विनायक गांवस
Published on: December 21, 2022 13:42 PM
views 753  views

सावंतवाडी : ऐतिहासिक सावंतवाडीत होणारा पर्यटन महोत्सव खास आकर्षण असतो. परंतु, तब्बल ३ वर्ष सावंतवाडीकरांना महोत्सवापासून वंचित राहावे लागले. यावर्षी सुद्धा हा महोत्सव होईल की नाही हा प्रश्नच आहे.  परंतु, सावंतवाडीतील महिला शक्तीच्या पुढाकाराने मागील तीन वर्षांचा हा बॅकलॉग भरून निघणार आहे. इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून महिलांनी 'इनरव्हील महोत्सवाचे' शिवधनुष्य उचलले असून इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून २३, २४, २५ डिसेंबर २०२२ रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान, सावंतवाडी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोना काळानंतर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव आयोजित होत आहे. या महोत्सवात मनोरंजनासाठी 'पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचा कठपुतली शो, सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा, स्टॅच्यू  स्पर्धा तसेच 'इनरव्हील क्वीन' ही विशेष स्पर्धा महिलांसाठी आयोजित केली आहे.

या महोत्सवातील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसेही दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे 'लकी ड्रॉ कुपन' हे महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असणार आहे. कोकणच नंबर वन महाचॅनेल 'कोकणसाद LIVE' या महोत्सवाचे मिडीया पार्टनर आहेत.

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून संपन्न होत असलेल्या 'इनरव्हील महोत्सव २०२२ - २३' अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा लहान गट (८ ते १४ वर्ष) ची अंतिम फेरी २३ डिसेंबर रोजी सायं. ७ ते १० या वेळेत होणार असून अधिक माहितीसाठी देवता हावळ ९३०७४१९४६९  यांच्याशी संपर्क साधावा. खुला गट  सोलो रेकॉर्ड डान्स १५ वर्षाच्यावरची अंतिम फेरी २४ डिसेंबर रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत होणार असून अधिक माहितीसाठी सोनाली खोर्जुवेकर ९४२२०७६६४५ यांच्याशी संपर्क साधावा. ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा (१२ वर्षापुढील) खुल्या गटासाठी घेण्यात येणार आहेत. यासाठी नाममात्र प्रवेश फी १०० रु. आकारली असून २४ डिसेंबर रोजी सायं. ७.३० ते १० या वेळेत थेट अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेबाबत वैभवी शेवडे ९४२२४३६५६८ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ६ ते १२ या वयोगटासाठी 'स्टॅच्यू स्पर्धा' होणार आहे. यासाठी नाममात्र प्रवेश फी ५० रु. आकारली जाणार असून २५ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. थेट अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेबाबत संगिता शेलटकर ९८६९५०६९८८ यांच्याशी संपर्क साधावा.

दरम्यान, याच दिवशी महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणारी 'इनरव्हील क्वीन' ही शानदार स्पर्धा ३० ते ५० वर्षे या वयोगटातील महिलांसाठी आयोजित केली आहे. यासाठी १०० रु. नाममात्र प्रवेश फी यासाठी आकारली जाणार असून २५ डिसेंबर रोजी सायं. ६ वा. थेट अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेबाबत शुभदा करमरकर ९४२११९०३८८, डॉ. सुमेधा धुरी ९४०५८१३९२६ यांच्याशी संपर्क साधावा. सोलो डान्ससाठी अंतिम फेरीत प्रविष्ठ होणाऱ्या स्पर्धकांना ५० रु. प्रवेश फी राहील. 

कोरोना काळात उद्योगधंद्यात आलेल्या मंदीनंतर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील लघू उद्योजकांना स्टॉलच्या माध्यमातून व्यवसायाची एक उत्तम संधी उपलब्ध होत आहे. या महोत्सवात विविध प्रकारच्या स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या महोत्सवाला सावंतवाडीतील, आजूबाजूच्या गावातील आणि पर्यटक मिळून हजारो लोक भेट देतील, अशी अपेक्षा इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीणे व्यक्त केली असून उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. यासाठी रीया रेडीज ९४२२०७६७२१, सोनाली खोर्जुवेकर ९४२२०७६६४५, शकुन म्हापसेकर ९४०५९२५७०२, ममता पाटणकर ९४०३०७३६११ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 'इनरव्हील महोत्सवाचे' हे शिवधनुष्य महिलांनी उचलले आहे. आव्हान खूप मोठे आहे. कोरोना काळानंतर प्रथमच अशा प्रकारचा महोत्सव आयोजित करत असून यात जिल्हावासियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इनरव्हीलच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, आयएसओ देवता हावळ, एडिटर डॉ. सुमेधा नाईक - धुरी, डॉ. सुभदा करमरकर, डॉ. मीना जोशी, मृणालीनी कशाळीकर यांनी केले आहे.