राज्यभर सायकलस्वारी करून शहिदांना आदरांजली वाहणारे भ्रमंतीकार अजित दळवींचा सावंतवाडीकरांनी केला सन्मान !

Edited by: रुपेश पाटील
Published on: December 21, 2022 18:36 PM
views 291  views

सावंतवाडी : तब्बल २८ राज्ये भ्रमंती करून शहिदांना सलामी देणाऱ्या सायकलस्वार अजित पांडुरंग दळवी यांचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व केशवसूत कट्ट्यावरील ज्येष्ठ नागरिकांकडून  सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील कोदेगाव येथील रहिवासी अजित पांडुरंग दळवी यांनी ऑल इंडिया सायकलिंग करीत २८ राज्यांमध्ये जाऊन शहिदांना सलामी दिली. सदर प्रवास त्यांनी २६ सप्टेंबर २०२२ पासून सुरुवात केला. या साठी त्यांनी पंधरा हजार किलोमीटर प्रवास ८६ दिवसात पूर्ण केला. 

दळवी हे सेमी गव्हर्मेंट इंडियन नेव्ही माजगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतात.

देशाबद्दल अफाट प्रेम व शहीद जवानांबद्दल मनस्वी आदर असल्याकारणाने ते कामावर सुट्टी घेऊन कर्मचारी व मित्रमंडळीकडून पैसे जमा करून ही सायकल भ्रमंती करीत आहेत. त्यांनी  मुंबईतून आपला प्रवास सुरू करून त्याचा शेवट गोवा येथे केला. 

या  भ्रमंतीसाठी त्यांना जवळपास एक लाख रुपये खर्च आला.

दरम्यान ठिक ठिकाणच्या राज्यांमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला होता. सोमवारी गांधी चौक, सावंतवाडी तालुका रिक्षा संघटना आयोजित कार्यक्रमामध्ये माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मोती तलाव येथील केशवसूत कट्ट्यावर शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडूनही त्यांचे कौतुक व सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी  सुधीर पराडकर,ओमकार पराडकर,  ज्येष्ठ वकील बापू गव्हाणकर, प्रदीप प्रियोळकर, विनायक  कोडल्याळकर,  धर्मेंद्र सावंत, जयवंत टकसाळ, सुभाष तावडे, महादेव बामणे, प्रा. एम. व्ही. कुलकर्णी, दत्तप्रसाद गोठोसकर , मधुकर घारपुरे, सुरेश मस्कर, प्रदीप  ढोरे, मुकुंद वझे, श्याम भाट, विश्वास जोशी,  प्रा. गोडकर व रवी जाधव आदि उपस्थित होते.