
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सावंतवाडी येथे युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक दात्यांनी या शिबिरात सहभागी होत पवित्र दान केले.
यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांना व रक्ताअभावी खोळंबलेल्या शस्त्रक्रियांना फायदा होणार असल्याचे मत जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे साई सावंत यांनी व्यक्त केले. अडचणीच्या काळात नेहमी सहकार्य करणा-या युवा रक्तदाता संघटनेचे त्यांनी आभार मानले. याप्रसंगी
युवा रक्तदाता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक देव्या सूर्याजी, डॉ.संदिप सावंत, ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे अधिकारी साई सावंत व टिम, सावंतवाडी रक्तपेढी तंत्रज्ञ प्राजक्ता रेडकर, महेंद्रा अकॅडमीचे महेंद्र पेडणेकर,ॲड. स्वप्निल कोलगावकर, ॲड संकेत नेवगी, मिहिर मठकर, प्रतिक कोरगावकर, प्रशांत कामत, युवा रक्तदाता संघटनेचे सल्लागार ॲड. प्रसाद नाटेकर, सचिव वसंत सावंत, ॲड. प्रथमेश प्रभू, दिग्विजय मुरगोड, देवेश पडते, भास्कर आमुणेकर, गुरुप्रसाद गवळी, आर्यन आमुणेकर, अजय भोजवीया व महेंद्र ॲकॅडमीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी उपस्थित राहून रक्तदान केले. यावेळी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी ओरोस येथे रक्ताचा तुटवडा असल्याने जिल्ह्यातील सामाजिक संस्था यांनी रक्तदान शिबिर आयोजित करुन रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री. सूर्याजी यांनी केले आहे.










