'त्या' विक्रेत्यांना भाजी मंडईत स्थान देणार

नियम सर्वांना सारखा असल्याने कारवाई : नगराध्यक्षा भोंसले
Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2026 13:43 PM
views 160  views

सावंतवाडी : स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या सुचनेनुसारच तेथील अनधिकृत भाजी विक्रेत्यांना‌ उठवण्यात आलं. तसेच इतरांवरही कारवाई केली. नियम सर्वांना सारखा असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली अशी माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली. तर मच्छी मार्केट ही जागा भाजी विक्रीसाठी चांगली नसून विक्रेत्यांना दुसरी जागा दिली जाईल, भाजी मंडईचे काम पूर्ण झाल्यानंतर तिथे जागा देऊ अस आश्वासन त्यांनी दिले. 

दरम्यान, शिवसेना नगरसेवकांकडून शहरातील इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी दिलेल्या आव्हानाबाबत विचारल असता त्या म्हणाल्या, सुरूवात एका ठिकाणाहून होते. नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या सुचनेनुसारच अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली. मात्र, नियम सर्वांना सारखा असल्याने इतरांवरही कारवाई करण्यात आली. भाजी मंडईचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांना तिथे चांगली जागा उपलब्ध करून देण्यात येईल, मच्छी मार्केट ही जागा भाजी विक्रीसाठी योग्य नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.