उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

राजकीय वर्तुळात चर्चा
Edited by: विनायाक गांवस
Published on: April 25, 2026 18:49 PM
views 90  views

सावंतवाडी : आगामी राजकीय मोर्चेबांधणीसाठी ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीत विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, रमेश गावकर, तालुकाप्रमुख राजू शेटकर, विभागप्रमुख आबा केरकर व सुनील गावडे यांचा समावेश होता. विशेष म्हणजे माजी खासदार विनायक राऊत यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. बदलती राजकीय समीकरणे, पक्षसंघटनेतील बळकटी आणि आगामी निवडणुकांची आखणी यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली.