उपरकर शूटिंग रेंजच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुयश

Edited by: विनायक गांवस
Published on: April 24, 2026 13:48 PM
views 40  views

सावंतवाडी : 8 वी ऑल गोवा स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन रायफल अँड पिस्तूल गोवा,मांद्रेम येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नेमबाजानी सहभाग घेतला होता.यामध्ये श्रीया अतुल नाखरे हिने उत्कृष्ट कामगिरी करून तब्बल 4 सुवर्ण पदक पटकविली यात 25 मीटर स्पोर्ट पिस्तूल युथ , 25 मिटर स्टॅंडर्ड पिस्तूल जुनिअर तर 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात जुनिअर व सिनियर गटा मध्ये सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

तर कु.अवनी मेघश्याम भांगले हिने 10 मिटर एअर पिस्तूल प्रकारा मध्ये सबयुथ व सिनियर गटात अनुक्रमे एक सुवर्ण व एक रौप्य पदकांनवर आपले नाव कोरले.खुल्या गटात श्री. अतुल नाखरे यांनी 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूल मेन इंडिव्हिज्युअल प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळविले तसेच कु.अद्वय अतुल नाखरे याने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सबयुथ व युथ गटात दोन सुवर्णपदक मिळविली तर श्री.जयवंत घोगळे यांनी मास्टर गटात 10 मी पीप साईट प्रकारात सुवर्ण तर ट्रॅप प्रकारात  चौथा क्रमांक मिळावीला. त्याच प्रमाणे सुरेश चाकरे यांनी 10 मी पिस्तूल मास्टर मध्ये सिल्वर व 25 मिटर स्पोर्ट्स पिस्तूल मास्टर मेन मध्ये ब्रॉन्झ मेडल तर चिराग बांदेकर यांना 50 मीटर फ्री पिस्तूल प्रकारात कांस्य पदक मिळाले. त्याच प्रमाणे गोवा येथील रहिवासी कु.स्नीधी राजन पिरणकर हिने पहिल्यांदाच सहभाग घेऊन 10 मी.रायफल प्रकारात युथ गटात सुवर्ण पदक पटकाविले. विशेष म्हणजे राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे खजिनदार, प्रशिक्षक व जुरी मेघश्याम भांगले यांनी या स्पर्धे मध्ये आपला हात आजमावत 10 मी पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. सर्व नेमबाज हे उपरकर शूटिंग अकॅडमी मध्ये नेमबाजीचा सराव करत असून त्यांना कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण तर विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभेल. पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.