
सावंतवाडी : एम.एन.जी.एल.च काम करण्याचे आदेश मी देऊ शकतो का ? तस असेल तर माझं महत्व मोठं आहे. त्यामुळे तसं असेल तर मला कल्पना द्या असे मत नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी व्यक्त केले. तसेच संबंधित नगरसेवकांना तशा सुचना द्या, नको ते आरोप सहन करुन घेणार नाही असा इशारा श्री. कुडतरकर यांनी दिला.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत हा विषय मांडला गेला. यावेळी नगरसेविका सुनिता पेडणेकर यांनी यावर खुलासा दिला. यावेळी श्री. कुडतरकर अन् सौ. पेडणेकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी हस्तक्षेप करत मार्ग काढला. यावेळी श्री. कुडतरकर यांनी संबंधित ठेकेदाराला बोलावून घ्या, नको तसले आरोप सहन करणार नाही असा इशारा दिला. तसेच चुकीचे आरोप करणाऱ्यांना समज द्या अशी मागणी श्री. कुडतरकर यांनी केली. यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर आदी उपस्थित होते.










