
सावंतवाडी : भंडारी समाज हॉस्टेल हॉल सावंतवाडी येथे फिटनेस योग अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या फिटनेस योग शिबिराचा रविवार 19 एप्रिल 2026 रोजी सांगता समारंभ संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सावंतवाडी शहरात योग प्रसाराचे कार्य खूप मोठ्या वेगाने चालू आहे. फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग यांच्या मार्फत विशेष योगाभ्यास घेण्यात आला. 3 दिवसांचे हे संपुर्ण योगशिबिर 17 एप्रिल ते 19 एप्रिल 2026 या कालावधी पर्यंत यशस्वी पणे संपन्न झाले. सावंतवाडी मधील योगाभ्यास प्रेमी महिलांचा या शिबिरामध्ये सहभाग लाभला.
यावेळी या शिबिराच्या कार्याध्यक्षा सौ संजना परब यांच्या हस्ते फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग चे योगशिक्षक श्री शेखर बांदेकर यांना शाल , श्रीफळ आणि भेटवस्तु देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ कांचन विरनोडकर, फिटनेस किड्स अकॅडमी चे जिल्हा अध्यक्ष श्री. विशाल लातये, फिटनेस कोषाध्यक्ष श्री रविंद्र प्रभुदेसाई, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. रसिका सावंत, उपाध्यक्ष चेतना शिंदे, कोषाध्यक्ष निशिगंधा सावंत, आणि सदस्य मृणाली राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग चे योगशिक्षक श्री शेखर बांदेकर यांनी सतत 3 दिवस शिबीर घेतल्यामुळे सर्व शिबिरार्थींनी आभार व्यक्त केले. सुत्र संचानल श्री विशाल लातये आणि आभार प्रदर्शन सौ संजना परब यांनी केले. सदर चे योग शिबीर हे खाजकीलवाडा सावंतवाडी येथे घेण्यात आले, हॉल मोफत उपलब्ध करून दिल्या बद्दल व्यवस्थापकांचे आभार व्यक्त करण्यात आले. सुमारे 60 योग साधकांची उपस्थिती या शिबिरास लाभली. शिबिर संपले तरी त्याच ठिकाणी दररोज आणि नियमित योग कक्षा चालू राहील त्याचा सावंतवाडी मधील योगाभ्यास प्रेमींनी फायदा घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले .










