
सावंतवाडी : गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र गणित विषयाच्या प्रगतीसाठी घेतली जाणारी गणित प्राविण्य परीक्षेत सावंतवाडी शाळा नंबर 2 चे सहा विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यामुळे या विद्यार्थ्याचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
यामध्ये साहिल शाहू खरात,श्रीकर मंदार शुक्ल ,पूर्वांग कुणाल मळगावकर,स्वामिनी अजित कोळी, सानवी चेतन देसाई,श्रीशा मिहिर प्रभुदेसाई या सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या सर्व मुलांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या सर्व मुलांना त्यांचे वर्गशिक्षक रणजीत सावंत यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पालक विद्यार्थ्यांच्या एकत्रित मेहनतीमुळे यश प्राप्त झाले आहे असे शाळेचे मुख्याध्यापक तेजस बांदिवडेकर यांनी सांगितले.तसेच या विद्यार्थ्याचे शाळेच्यावतीने कौतुक करण्यात आले.










