
कुडाळ : कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल (CBSE) च्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तुंग यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. दिनांक १५ एप्रिल रोजी घोषित झालेल्या या निकालात, शाळेतील २७ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेतील गुणवंत विद्यार्थी शाळेतून प्रथम तीन क्रमांकावर आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:
१. सान्वी सुचित खवणेकर ९७.६ %, २. निरंजन संजय कुशे ९५.४ %, ३. शर्वरी संजीवकुमार प्रभू ९४.८ % प्रशालेच्या एकूण ४ विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे:
सान्वी खवणेकर: मराठी व माहिती तंत्रज्ञान (IT)
निरंजन कुशे: मराठी
निधी कुशे: मराठी
संस्कृती लाड: मराठी
प्रशालेने यंदाही निकालात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे:
एकूण विद्यार्थी संख्या: २७
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण: सर्व २७ विद्यार्थी
उच्चतर प्रथम श्रेणी (Higher First Class): १९ विद्यार्थी
९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे: ६ विद्यार्थी
विद्यार्थ्यांच्या या भरघोस यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अमृता गाळवणकर, प्राचार्या सौ. चैताली बांदेकर, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षक-पालक संघाच्या प्रतिनिधींनी अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










