आसोली नं. १ शाळेला उदय आसोलकर यांच्याकडून लॅपटॉप भेट

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 17, 2026 19:44 PM
views 27  views

सावंतवाडी : जि.प. पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्या मंदिर, आसोली नं. १ येथे शाळेचे माजी विद्यार्थी उदय भास्कर आसोलकर यांनी शाळेसाठी लॅपटॉप भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान दिले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी शाळेच्या प्रगतीची दखल घेत मुख्याध्यापिका वैभवी वसंत रायशिरोडकर यांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू प्रदान केली तसेच विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक शिष्यरत पवार यांनी केले.  श्री. आसोलकर यांनी आपल्या शाळेबद्दल दाखवलेला जिव्हाळा, आपुलकी व सामाजिक बांधिलकी ही इतरांसाठी नक्कीच  प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उदात्त कार्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असून शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.यावेळी श्री असोलकर यांनी शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्याध्यापिका सौ. रायशिरोडकर यांनी आभार प्रदर्शन केले. असोलकर यांनी शाळेला केलेल्या सहकार्याबद्दल सौ . रायशिरोडकर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.