
सावंतवाडी : 'नारी शक्ती वंदन’ अधिनियमाच्या समर्थनार्थ सावंतवाडीत नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. ज्यात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नारीशक्तीचा हा केवळ उत्सव नाही, तर इतिहासाचा नवा अध्याय आहे. लोकसभा व विधानसभेत ३३ % आरक्षणासह आज स्त्रीचा आवाज सन्मानाने मान्य केला जात आहे. ती आता फक्त सहभागी नाही तर ती आता निर्णयकर्ती ठरत आहे. समानतेकडे ठाम, अभिमानाने टाकलेले हे पाऊल असून या परिवर्तनासाठी मोदी सरकारचे आभार नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी मानले आहेत. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, नगरसेविका दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदींसह महिला पदाधिकारी, कार्यकर्तया मोठ्या संख्येने उपस्थित होत्या










