अ. भा. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी समिल जळवी

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 12, 2026 18:09 PM
views 36  views

सावंतवाडी : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार समिल जळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य संघटक सीताराम गावडे यांनी श्री. जळवी यांच्या निवडीची घोषणा आज केली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ संपादक सागर चव्हाण, राज्य संघटक तथा ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक तसेच जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, जिल्हा संघटक आनंद धोंड यांच्या समन्वयातून ही निवड करण्यात आली.

दरम्यान, डिजिटल तंत्रज्ञानातील अभ्यासू पत्रकार समिल जळवी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देखील या निमित्ताने सोपविण्यात आली आहे. यावेळी राज्य संघटक सीताराम गावडे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आबा खवणेकर, सावंतवाडी तालुका सचिव सिद्धेश पुरलकर, प्रसिद्धी प्रमुख साबाजी परब, सदस्य शुभम सावंत, श्रीरंग सावंत, नितीन गावडे व अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.यावेळी नूतन कार्याध्यक्ष समिल जळवी म्हणाले की, मला संघटनेच्या वरिष्ठ पातळीवरून जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आपण संघटनेचे आभार मानतो. तसेच आपण आगामी काळात प्रामाणिक व निष्ठेने संघटनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून संघटनेला एका आदर्श उंचीवर नेणार असल्याचा संकल्प यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांसमोर व्यक्त केला.

दरम्यान यावेळी सीताराम गावडे यांनी संघटनेच्या ध्येय-धोरणे व कार्यपद्धती याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अनेक संघटना लढतात पण आपली संघटना ही पत्रकारांच्या कुटुंबासाठी आणि विशेषतः त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रभावीपणे लढत असल्याचे सांगितले तसेच त्यांनी नूतन कार्याध्यक्ष श्री. जळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेत जबाबदारी स्वीकारल्याबद्दल स्वागत केले. या नव्या कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष श्री. जळवी व सदस्य पत्रकार बांधवांकडून डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, संघटन मजबूत करणे आणि पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, नूतन जिल्हा कार्याध्यक्ष श्री. जळवी यांचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, राज्य सचिव तेजस राऊत यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.