विशाल परब यांच्याकडून महात्मा ज्योतिबा फुलेंना आदरांजली

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 12, 2026 17:34 PM
views 40  views

सावंतवाडी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरतात. समाजातील अज्ञान दूर केल्याशिवाय समाजात नवा विचार रुजणार नाही, हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी अचूकपणे ओळखले आणि शिक्षणाचा दीप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला असे मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना नमन करत  आदरांजली अर्पण केली. सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीतर्फे महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. 

भारतीय जनता पार्टी महापुरुषांच्या केवळ प्रतिमांचे नव्हे तर त्या मागच्या विचारांचे पूजन करते. महात्मा फुलेंचा आदर्श घेऊन आमच्या माध्यमातून मागील काही कालावधीत सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले आहे. लहान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर वाटप याचबरोबर विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांना सदैव सहकार्य केलेले आहे. अशाप्रकारे सामाजिक काम करण्यासाठी महात्मा फुले यांच्यासारख्या क्रांतिसूर्याचे विचार अत्यंत मोलाचे आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते आचरणात आणण्याचे आणि तळागाळातील जनतेला त्याचा लाभ मिळवून देण्याचे कार्य सदैव सुरू राहील असं श्री. परब यांनी सांगितले.  सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी श्री विशाल परब यांच्यासोबत सोशल मीडिया अध्यक्ष केतन आजगावकर, भाजपा पदाधिकारी धीरेंद्र म्हापसेकर, साईप्रसाद भोई आदी मान्यवर उपस्थित होते.